License Guidelines

Post Image

Pet Animal License Guidelines

  1. Pet owners must provide optimum animal welfare standards for their pets by providing safe, comfortable, hygienic housing and ensuring the pet is not undergoing any unnecessary stress.
  2. Pet owners should not leave their animals unsupervised and free roaming on public streets. Pet dogs must always be supervised and walked on a leash of suitable length when in public spaces to avoid any negative interactions between your pet and the public community.
  3. Pet owners must ensure to responsibly dispose of their pets’ waste and hygienically pick up their pets’ droppings from public areas and dispose of it appropriately.
  4. Ensure that anti-rabies vaccine must be given annually to your pet dog and obtain veterinary doctors' certificates for the same. Any dog suspected of rabies must be informed to a veterinarian immediately.
  5. Pet licenses must be renewed by pet owners regularly.
  6. A metal ID tag will be provided to the pet owner upon successful registration and must be displayed on the pet’s clilar.
  7. Non-adherence to the above guidelines may attract penalties or legal actions.

Note: This pet registration license is issued under the Maharashtra Municipal Act, 1949, Section 14, Rule 22(b) part 1.





पाळीव प्राणी परवाना मार्गदर्शक तत्त्वे

  1. पाळीव प्राण्यांच्या मालकाने त्यांच्या पाळीव प्राण्यांकरिता सुरक्षितता प्रदान करणारे सुसंस्कृत वातावरण उपलब्ध करणे आवश्यक आहे, आरामदायी, स्वच्छ निवासाची प्रदान करणे आणि पाळीव प्राणी कोणत्याही अनावश्यक तणावात नाही याची खात्री करणे अनिवार्य आहे.
  2. पाळीव प्राण्याच्या मालकाने त्यांचा प्राणी एकट्याने आणि सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे फिरू न देता नेहमी त्यांच्यासोबत असणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्याला नेहमी योग्य लांबीच्या साखळीने बांधून ठेवले पाहिजे जेणेकरून कोणतेही नकारात्मक प्रसंग टाळले जातील.
  3. पाळीव प्राण्यांच्या मालकाने त्यांच्या प्राण्यांच्या मलमूत्राची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आणि सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्याच्या मलमूत्राचे उचलून त्याचे योग्य प्रकारे निपटारा करणे आवश्यक आहे.
  4. तुमच्या पाळीव कुत्र्याला नियमितपणे वार्षिक रेबीज प्रतिबंधक लस दिली पाहिजे आणि त्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे. रेबीजचा संशय असलेल्या कोणत्याही कुत्र्याची तत्काळ माहिती पशुवैद्यकांना द्यावी.
  5. पाळीव प्राण्याचा परवाना पाळीव प्राण्याच्या मालकाने नियमितपणे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
  6. यशस्वी नोंदणी केल्यानंतर पाळीव प्राण्याच्या मालकाला मेटल टॅग प्रदान केले जाईल आणि आवश्यक आहे ते टॅग पाळीव प्राण्याच्या गळ्यात लावले जावे.
  7. वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

टीप: हे पाळीव प्राणी नोंदणी परवाना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949, कलम 14 अंतर्गत दिले जाते, नियम 22(b) भाग 1.

Post Image